कुगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची कोटलींग मंदिरास भेट – स्वच्छता व परिसरातील विविध माहितीचा केला संग्रह..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेल्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कोटलिंग मंदिरावर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुगांव येथील विद्यार्थ्यांनी शालेय व सहशालेय उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दादा गुलाम सय्यद, नवनाथ मारकड व दादाभाऊ येवले यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या मंदिराविषयी मार्गदर्शन केले सर्व मुलांनी कोटलींगाचे दर्शन घेतले. मुलांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा या मूल्याची जोपासना व्हावी या अनुषंगाने मंदिराचा गाभारा, व्हरंडा, आतील- बाहेरील परिसर,विठ्ठल- रुक्मिणीचे मंदिर, हनुमान मंदिर, शनि देवाचे मंदिर, पोळी- पोमाई चे मंदिर व संपूर्ण परिसर मनापासून स्वच्छ केला.
या निमित्ताने कोटलिंग मंदिराचे पुजारी सचिन बबन धारक यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना या मंदिराविषयीची पार्श्वभूमी सांगितली मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते आहे हे पाहून कुगांव सुपुत्र सोलापूर येथील शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखापरीक्षक दयानंद कोकरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकी ज्ञान तर देत असतोच परंतु त्यांना व्यवहार ज्ञान परिसर माहिती असली पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाची ठिकाणांची सखोल माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही या परिसरात प्रक्षेत्र भेट आयोजित केली होती उपक्रम विद्यार्थी व पालकांना फारच आवडला आहे. – नवनाथ मारकड (उपक्रमशील शिक्षक जिल्हा परिषद शाळा कुगाव)