किरकोळ कारणावरून वाहकास मारहाण-अंजनडोह च्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

किरकोळ कारणावरून वाहकास मारहाण-अंजनडोह च्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१५: बसमधून प्रवास करताना किरकोळ कारणावरून वाहकाशी हुज्जत घालत तिघांनी त्यांना मारहाण केली…


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१५: बसमधून प्रवास करताना किरकोळ कारणावरून वाहकाशी हुज्जत घालत तिघांनी त्यांना मारहाण केली आहे. ही घटना करमाळा बसस्थानकावर १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक च्या सुमारास घडली. याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात वाहक महेश कोंडीबा मस्के (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की मी तारकपूर, (अहिल्यानगर) येथून गाणगापूरकडे बस घेऊन जात असताना हिराबाई राजेंद्र देवमुंडे व राजेंद्र देवमुंडे हे दोघे मिरजगाव येथे बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान त्यांनी कोणतेही कारण नसताना माझ्याशी हुज्जत घालून भांडण सुरू केले.
बस करमाळा येथे आल्यानंतर हिराबाई मुंडे व राजेंद्र मुंडे हे बसमधून खाली उतरले. त्यावेळी त्यांचा साथीदार विराज राजेंद्र देवमुंडे (सर्व रा. अंजनगाव, ता. करमाळा) हा तेथे आला. त्यानंतर या तिघांनी मला हाताने मारहाण केली. या मारहाणीत माझा चष्मा फुटला. तसेच तिघांनी शिवीगाळ व दमबाजी करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा आणला. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!