पतीला पळवून नेल्याची पत्नीची फिर्याद - Saptahik Sandesh

पतीला पळवून नेल्याची पत्नीची फिर्याद


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा : केम येथे घरात झोपलेल्या पतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार ४० वर्षीय महिलेने पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण करून घरात झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठल्यानंतर त्यांचे पती मुकेश शेटीबा धोत्रे (वय ४५) हे घरात दिसून आले नाहीत.

यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा घर परिसरात तसेच नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने पतीला फूस लावून किंवा अन्य कारणाने पळवून नेले असल्याचा संशय महिलेने व्यक्त केला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

error: Content is protected !!