केम येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी

केम(संजय जाधव) : अनुलोम सामाजिक संस्था व भैरवनाथ मित्र मंडळ, पाटील गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य श्री गणेशाचा’ या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामवंत शासकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब, रक्तातील साखर, कर्करोग, नेत्र तपासणी तसेच ईसीजी आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचा एकूण १२५ गरजू नागरिकांनी लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ मित्र मंडळ, पाटील गल्लीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


