गणेशोत्सवानिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरात आकर्षक सजावट

केम(संजय जाधव) : येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या शिवलिंगास सोमवार व गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली. पुजारी गणेश गुरव, शुभम लांडगे व समाधान गुरव यांनी ही सजावट केली.
श्री उत्तरेश्वर मंदिरात दर सोमवारी तसेच विविध सण-उत्सवानिमित्त शिवलिंगाची वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक सजावट केली जाते. गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेली सजावट पाहण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाली. सजावट पाहून भाविकांचे मन प्रसन्न होत असून भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
“मंदिरात दर सोमवारी तसेच विविध सणांच्या निमित्ताने शिवलिंगाची आकर्षक सजावट केली जाते. ही सजावट पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ माऊली तळेकर यांनी व्यक्त केली.


