भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे आठ विद्यार्थी राज्य यादीत.. - Saptahik Sandesh

भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे आठ विद्यार्थी राज्य यादीत..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जानेवारी 2023 घेण्यात आलेल्या भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षामध्ये करमाळा येथील गुरुकुल पब्लिक स्कूलचे आठ विद्यार्थी राज्य यादीत यशस्वी झाले आहेत. यानिमित्ताने गुरूकुल पब्लिक स्कुलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या परीक्षेत इयत्ता दुसरी मधील प्रतीक होनकळसे राज्यात आठवा जिल्ह्यात सहावा, तसेच इयत्ता तिसरीतील आदित्य भांगे राज्यात तिसरा जिल्ह्यात पहिला ,समर्थ शेळके राज्यात सातवा जिल्ह्यात तिसरा ,स्पंदन सावंत राज्यात 17 वी जिल्ह्यात दहावी, तरेश थोरात राज्यात 16 वा जिल्ह्यात अकरावा, पंशुल सरडे जिल्ह्यात सतरावा अदिती चेंडगे , जिल्ह्यात सतरावा ,इयत्ता चौथी अमरनाथ चिवटे राज्यात 14 वा जिल्ह्यात आठवा ,इयत्ता सातवी सार्थक सूर्यवंशी राज्यात बारावा जिल्ह्यात चौथा ,इयत्ता चौथी शुभनीत साळुंखे केंद्रात सातवा ,इयत्ता पाचवी शार्दुल कुलकर्णी केंद्रात दुसरा ,इयत्ता सातवी शर्वरी सपकाळ केंद्रात चौथी, इयत्ता आठवी अथर्व राठोड केंद्रात पहिला असे यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरुकुल पब्लिक स्कूलच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!