शेटफळच्या लेझीम संघाचा 'शिवराज्याभिषेक सोहळ्यात' सन्मान.. - Saptahik Sandesh

शेटफळच्या लेझीम संघाचा ‘शिवराज्याभिषेक सोहळ्यात’ सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रायगड किल्ला येथील झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होऊन उत्कृष्ट लेझीम सादरीकरण केल्याबद्दल शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील नागनाथ लेझीम संघाला सन्मानचिन्ह देऊन युवराज संभाजी छत्रपती महाराज व महाराणी संयोगीताराजे महाराज यांच्या हस्ते गौरविण्यात आले व पुढील वर्षी सहभागासाठी निमंत्रण देण्यात आले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समीती दुर्गराज रायगड यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्राचे आयोजन‌केले जाते महाराष्ट्रातील प्राचीन युद्ध प्रात्यक्षिके, कलापथके, विविध वाद्ये, शाहीर, गोंधळी आहे विविध लोक कलावंत आपली कला सादर करतात तर विविध ठिकाणची ढोलताशा पथके,झांज पथके , यांचा सहभाग असतो.यावर्षी शेटफळ ता.करमाळा येथील नागनाथ लेझीम संघातील १२५ तरुणांनी सहभाग असलेला लेझीम संघ यावर्षीच्या सोहळ्याचे आकर्षण ठरले.

शेटफळ येथील लेझीमचे सादरीकरण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले व उस्फुर्तपणे दाद दिली.यावेळी या सोहळ्याच्या नियोजक महाराणी स्वयंगिताराजे यांनीही लेझीमच्या तालावर ठेका धरून संघाला प्रोत्साहित केले.या सोहळ्यातील सहभागाबद्दल नागनाथ लेझीम संघाला सन्मानचिन्ह प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!