पोथरे येथील संदिप झिंजाडे-पाटील यांचे डेंग्यूने निधन – पाटील परिवारावर दुःखाची छाया..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
कारमाळा (ता.16) : पोथरे (ता.करमाळा) येथील संदिप बाळकृष्ण झिंजाडे-पाटील (वय-44) यांचे डेंग्यूने अजाराने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने पाटील परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या मागे आई,वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
संदिप -झिंजाडे पाटील गेल्या चार दिवसापूर्वीच आजारी पडले होते. खासगी रूग्णांलयात उपचार सुरू होते.जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना नगर येथील खासगी रूग्णांलयात नेले होते, उपचार सुरू असतानाच आज (ता.१६) सकाळी त्यांचे निधन झाले.
आज (ता.१६) सायंकाळी साडेसाहा वाजता त्यांच्या पार्थिवावर पोथरे (ता.करमाळा) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर सतिश झिंजाडे यांचे ते थोरले बंधू होते. त्यांच्या निधनाने पाटील परिवारवर दुःखाची छाया पसरली आहे. ही घटना समजताच प्रशासन सतर्क झाले आहे.