जनसामान्याचा नेता म्हणुन चंदूकाकांची राजकारणात ओळख - आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

जनसामान्याचा नेता म्हणुन चंदूकाकांची राजकारणात ओळख – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१६) : चंदुकाकानी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून जनसामान्याचे नेते असलेले चंदूकाका यांच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.

चिखलठाण (ता.करमाळा) येथील सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जयवंतराव जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुक शिंदे गट जगताप गट युतीच्यावतीने लढवण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.

पुढे बोलताना संजयमामा म्हणाले की, एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर चंदूकाका सरडे यांनी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य तसेच आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन यासारखी पदे त्यांनी भूषवले असून, सध्या जनतेचे सरपंच म्हणून ते काम करीत आहे. आपल्या कार्याच्या जोरावर अखंड जनसमुदायाचा पाठिंबा मिळवुन कार्यकर्ते टिकून विकासाचा रथ चालवणे एवढे सोपे नाही. त्यासाठी जनसामान्यांची सेवा करण्याचा पिंड असावा लागतो. काकांनी साखर कारखानदारी ऊस तोडणी वाहतुकीच्या माध्यमातुन अनेकांना रोजगार मिळवुन दिला असुन जनसामान्याचा नेता म्हणुन त्यांची राजकारणात ओळख निर्माण झाली आहे. चंद्रकांत काका सरडे यांना समाज कल्याणची तळमळ असुन समाज कल्याण करण्याचे काम केल्यामुळे राजकारणात यशस्वी झाले आहेत असेही आमदार श्री.शिंदे यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये आदिनाथ कारखान्याचे मा.संचालक तानाजी बापू झोळ आदिनाथ कारखान्याचे मा.चेअरमन वामनदादा बदे मा.जि.प. सदस्य उध्दवदादा माळी, दादासाहेब लबडे,भोजराज सुरवसे,महादेव कामटे सामाजिक कार्यकर्त श्रेणिक खाटेर गणेश करे पाटील उमेश बोराडे आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत काका सरडे यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त सपुंर्ण दिवस कार्यक्रमाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकात सरडे युवा मंचच्यावतीने करण्यात आले होते.यामध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान ल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले असुन सोलापुर येथील सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिबिर संप्पन झाले.या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन ह भ प दुर्गाप्रसाद तिडके महाराज गणेश करे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरामध्ये चंदुकाकांना शुभेच्छा देण्यासाठी देवानंद बागल ,नानासाहेब लोकरे, कन्हैयालाल देवी, धनंजय डोंगरे, धुळाभाऊ कोकरे अजित तळेकर डॉक्टर गोरख गुळवे सुनील सावंत, गणेश करे पाटील, राजेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार केला. चिखलठाण ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.जनतेचे सरपंच तालुक्याचे लोकनेते चंद्रकांत सरडे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संप्पन झाला.या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!