सरपडोह ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामस्थांना 'मेडीक्लोर' चे वाटप.. - Saptahik Sandesh

सरपडोह ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामस्थांना ‘मेडीक्लोर’ चे वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे पिण्याचे पाणी खराब झाले आहे त्यामुळे सरपडोह ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व कुटुंबांना मेडिक्लोर बाटलीचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर सर्व विकास सेवा सोसायटीच्या सचिवपदी अनिल माने यांचे नियुक्ती झाल्यामुळे सरपडोह ग्रामस्थांच्या वतीने सोसायटी चेअरमन लक्ष्मण मारुती खराडे यांच्या हस्ते अनिल माने यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ व नूतन सत्कारमूर्ती अनिल माने यांचे स्वागत व ग्रामस्थांना मार्गदर्शन पर मनोगत नाथराव रंदवे उपसरपंच यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना अनिल माने यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व गावातील विकास सेवा सोसायटी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी व सर्व सभासदांना कर्ज वाटप करण्यात आपण प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले.

यावेळी सरपंच, उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटीचे चेअरमन ,सोसायटीचे सर्व सभासद, पोलीस पाटील, तंटामुक्तीअध्यक्ष, दूध संस्था चेअरमन, रेशन दुकानदार व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!