करमाळा तालुक्यात अवघ्या 12 दिवसांत सात तरुणी व एक युवक बेपत्ता

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा ता.१२:  १ जुलैपासून १२ जुलैपर्यंत अवघ्या १२ दिवसांत तालुक्यातील सात तरुणी आणि एक युवक बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांची करमाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून संबंधितांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, १ जुलै रोजी कंदर येथील २५ वर्षीय तरुणी आणि शेटफळ येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्या. २ जुलै रोजी करमाळा शहरातील मौलाल माळ परिसरातील २१ वर्षीय तरुणी हरवली. ३ जुलै रोजी हिसरे येथील २४ वर्षीय तरुणी, ४ जुलै रोजी जेऊर येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली.
त्यानंतर ११ जुलै रोजी आळजापूर येथील २० वर्षीय तरुणी, तर १२ जुलै रोजी कंदर येथील १८ वर्षीय तरुणी आणि मलवडी येथील १८ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणांचा करमाळा पोलीस कसून तपास करीत असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या बेपत्ता व्यक्तींपैकी कोणाबाबतही माहिती अथवा ठावठिकाणा समजल्यास नागरिकांनी तात्काळ करमाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!