करमाळ्यातील लावंड-ढाणे यांच्यातील वाद माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मध्यस्थीने मिटला..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरामधे काही दिवसापूर्वी लावंड व ढाणे यांच्यातील तरुणांमधे किरकोळ कारणांमुळे गैरसमजातून वाद झाला होता, या वादाचे रूपांतर आपापसात हाणामारी व एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत झाले होते. त्यामुळे हा वाद माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे आला व श्री.जगताप यांचे आवाहनाला मान देत दोन्ही बाजूच्या युवकांनी एकमेकाला पेढा भरवित – गळाभेट घेत सर्व वाद संपुष्टात आणल्याचे सांगीतले.

याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले की, करमाळा शहर व तालुक्यात स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशभक्त माजी आमदार स्व नामदेवराव जगताप व कर्मवीर स्व आण्णासाहेब जगताप यांनी या तालुक्यातील सामाजीक वातावरण लोकशाही मार्गाने स्वातंत्र्य व आपापसात सौहार्दपूर्ण, जातिभेद विरहीत , दहशत व भयमुक्त ठेवत आपली सार्वजनिक जीवनातील वाटचाल ठेवली होती. याच उदात्त विचारसरणीनुसार आम्ही आपली सामाजीक व राजकीय वाटचाल ठेवली आहे,

ज्याप्रसंगी आपापसातील गैरसमजामुळे लावंड व ढाणे यांचेत वाद होवून गुन्हे दाखल झाले, आपल्या शहरात येणार्‍या भावी पिढीच्या डोक्यात एकमेकाबद्दल अशा प्रकारचे किल्मिष व वादविवाद होणे शहराच्या सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नाही असेही श्री.जगताप यांनी सांगितले.

हा वाद माजी आमदार जगताप यांच्याच शब्दाचा मान राखत मिटू शकतो व यासाठी श्री जगताप यांनी पुढाकार घ्यावा, अशी साद दोन्ही गटातील काही समंजस व्यक्तिंनी घातली, त्यानुसार माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर लावंड, रामभाऊ ढाणे, दादासाहेब इंदलकर, रमेश वीर, अमोल परदेशी, सुनील ढाणे , घरबुडवे, विठ्ठल क्षिरसागर, जोतीराम ढाणे,सतीश फंड, प्रमोद पोळ यांचेसह लावंड व ढाणे समर्थक सर्व युवक माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे निवासस्थानी एकत्रित जमले.

यावेळी माजी आमदार जगताप यांनी सर्वांना एकत्रितपणे आनंदाने राहण्याचे आवाहन करीत गैरसमजातून झालेल्या वादाला तिलांजली देत युवकांनी शिक्षण, उद्योग, व्यवसाय ,भावी करीअर व संभाव्य जबाबदारीकडे लक्ष केंद्रीत करणेबाबत जागृती केली. जगताप यांचे आवाहनाला मान देत दोन्ही बाजूच्या युवकांनी एकमेकाला पेढा भरवित – गळाभेट घेत सर्व वाद संपुष्टात आणल्याचे सांगीतले. हा वाद मिटविण्यात अत्यंत महत्वपूर्ण भुमिका पार पाडल्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा लावंड व ढाणे ग्रुपच्या वतीने सुधाकर लावंड, रामा ढाणे यांनी यथोचित सत्कार केला. या झालेल्या निर्णयानंतर माजी आमदार जगताप यांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!