आरोग्यसेविका राणीबाई परदेशी यांचे निधन - Saptahik Sandesh

आरोग्यसेविका राणीबाई परदेशी यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील आरोग्यसेविका स्व. राणीबाई दत्तूसिंग परदेशी यांचे २० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने करमाळा येथे निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय ८० होते.

१९७१ पासून त्या कुटीर रुग्णालयामध्ये आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होत्या. ३८ वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर त्या सेवानिवृत्त झाल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रुग्णांची मनापासून सेवा केली. त्यांच्या पश्चात १ मुलगी १ सून,३ नातु,३ नात आहेत.

त्यांचा दशक्रिया विधी दिनांक २९ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र संगोबा येथे सकाळी 8 वा करण्यात येणार आहे अशी माहिती बबिता सु. ठाकर (स्व.परदेशी यांची मुलगी) यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!