कंदर येथे निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण – विविध तज्ञांचे होणार मार्गदर्शन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाच्यावतीने कंदर तालुका करमाळा येथे केळी निर्यात विषयक क्षमतावृद्धीसाठी कंदर येथे एक दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांमध्ये विविध तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने कृषी निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी माल निर्यात वाढीसाठी केंद्र सरकारच्या मार्फत सेंट्रल सेक्टर स्कीम राबविण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांच्या क्लस्टर मधील क्षमता वाढीसाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार प्रक्रिया दार यांना क्षमता वाढीकरिता कंदर (ता.करमाळा) येथील साई मंगल कार्यालयात एक दिवसाचे दिनांक 28 डिसेंबर रोजी एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमांमध्ये जमिनीचे आरोग्य, पाणी व्यवस्थापन, केळी पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्यवस्थापन, निर्यात व प्रक्रिया यासारख्या महत्त्वाच्या केळी पिक तज्ञ जैन इरिगेशनचे के.बी.पाटील, कृषी विज्ञान केंद्र मोहळ येथील काजल म्हात्रे ,फळ संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील शास्त्रज्ञ एन.बी.शेख, सह्याद्री फार्मर्स नाशिकचे केळीतज्ञ सचिन वाळूंज, अमोल महांगडे किरण डोके अभिजीत पाटील आधी तज्ञांकडून मार्गदर्शक मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पनन मंडळाचे आदित्य माने,आनंत सावरकर, राजेंद्र महाजन व दयानंद देशमुख उपस्थित रहाणार आहेत, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पणन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.