भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणास सहा जणांकडून बेदम मारहाण – सोन्याची चैन पळविली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरात जीन मैदानात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार ११ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता घडला आहे. या प्रकरणी संतोष हनुमंत करगळ (रा.रावगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की ११ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता दिवाळी बाजारासाठी करमाळ्यात आलो असता, माझे चुलते गोवर्धन करगळ यांनी फोन करून सांगितले की, आपले ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार यांना जीन मैदान समोरील केकान किराणा दुकानसमोर काही लोक मारत आहेत असे सांगितले. त्यावेळी मी तेथे जाऊन भांडण सोडविण्यास गेलो असता फुंदेवाडीचे सरपंच किरण फुंदे, चंद्रकांत फुंदे, अजय फुंदे, प्रविण केकान, अरूण केकान, भाऊ बुधवंत या लोकांनी मलाही मारहाण केली आहे. तसेच माझ्या गळ्यातील अर्धा तोळ्याची सोन्याची चैन तोडून घेतली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!