केम येथील एकाच घरात तीन वेळा चोरी - ४० हजारांची सोन्याची चैन लंपास - घरात भीतीचे वातावरण.. - Saptahik Sandesh

केम येथील एकाच घरात तीन वेळा चोरी – ४० हजारांची सोन्याची चैन लंपास – घरात भीतीचे वातावरण..

केम / प्रतिनिधी : संजय जाधव :

करमाळा : केम (ता.करमाळा) येथील संतोष बापुराव धर्मराज यांच्या घरात एका अज्ञात चोरट्याने तीन दिवस चोरी केली असून यामध्ये ४० हजारांची सोन्याची चैन पळवून नेली आहे, विशेष म्हणजे या चोरट्याला तीनही दिवस चोरी करताना पाहिले, परंतु त्यास पकडण्यात अपयश आले आहे, त्यामुळे तीन दिवस चोरी करूनही हा चोर पुन्हा येत असल्याने या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी केम येथील पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या हकीकत अशी की 20 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याची सुमारास एका चोरट्याने घरातील जिन्यातून घरात प्रवेश करून श्रुती संतोष धर्मराज हिच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी पळून नेली सकाळी उठल्यानंतर चैन दिसली नाही कुठेतरी हरवले असेल म्हणून दुर्लक्ष केले त्यानंतर 24 डिसेंबरला चोर पुन्हा त्याच जिन्यातून घरात प्रवेश करून आत मधील मोटरसायकलचे लॉक तोडताना दिसून आला त्यावेळी चोर चोर म्हटल्यानंतर हा चोर पुन्हा पळून गेला, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना सांगितले, परंतु त्या चोरास पकडण्यात अपयश आले.

त्यानंतर 25 डिसेंबरच्या रात्री पुन्हा त्याच घरात चोर येऊन घरातील कपाटाची सामान अस्ताव्यस्त करून सर्वत्र फेकाफेकी केली होती व त्यावेळी या चोराला पाहिले त्याला त्याला पकडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले परंतु तो पळून जाण्यात यशस्वी विचारला या घरात सलग तीन दिवस चोर येत असल्याने या घरातील सदस्यांना भीतीचे वातावरण तयार झाले आहे याप्रकरणी संतोष धर्मराज यांनी केम येथील पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!