सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यात आज (२० जुलै) जनजागृती मोर्चा

0

करमाळा (प्रतिनिधी): वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET-2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी व अनियमिततेच्या निषेधार्थ…

करमाळा (प्रतिनिधी): वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET-2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी व अनियमिततेच्या निषेधार्थ शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET-2026 परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून त्यांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. देशभरातील २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले. त्यानंतर त्यांना सरकारने बळजबरीने उपचार करण्यास घेऊन गेले आहेत. परंतु अजूनही अभिजीत दीपके व इतर यांनी हे आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे जनजागृती मोर्चा काढण्यात येणार आहे.



20 जुलै रोजी करमाळ्यात जनजागृती मोर्चा

या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व गावांतील विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी,  विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता कमलाभवानी मंदिर, करमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अमोल दुरंदे व ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!