करमाळा तालुका इंग्लिश स्कूल संघटनेच्या अध्यक्षपदी जयंत दळवी - Saptahik Sandesh

करमाळा तालुका इंग्लिश स्कूल संघटनेच्या अध्यक्षपदी जयंत दळवी

करमाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन (MESTA-F)च्या करमाळा तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची…

करमाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन (MESTA-F)च्या करमाळा तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे, प्रदेश सचिव गणेश निळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष वलगे, प्रदेश सदस्य नितीन भोगे, जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, जिल्हा सचिव शरद अनंतकवळस, जिल्हा खजिनदार डॉ. अमोल दुरंदे आदी उपस्थित होते.



करमाळा तालुका इंग्लिश स्कूल संघटनेचे मार्गदर्शक कन्हैयालाल देवी, ज्येष्ठ प्रदेश सदस्य जयप्रकाश बिले, आसादे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. करमाळा तालुका उपाध्यक्षपदी राजकुमार राऊत, तर सचिवपदी डॉ. ब्रिजेश बारकुंड यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नियुक्त्या महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन (MESTA-F)च्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आल्या.


करमाळा तालुका इंग्लिश स्कूल संघटनेसमोर अनेक समस्या असून, त्या मंत्रालय पातळीवरून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नूतन अध्यक्ष जयंत दळवी यांनी सांगितले. सध्या शिक्षक मतदारसंघ तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवरील इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटी घेत आहेत. संघटनेच्या दहा प्रमुख मागण्या असून, या मागण्यांसंदर्भात संबंधित इच्छुक उमेदवारांना निवेदने देण्यात आली आहेत. या मागण्या मंजूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यास आगामी निवडणुकीत संबंधित उमेदवारांना संघटनेतर्फे योग्य ते सहकार्य केले जाईल, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!