विहाळच्या उपसरपंचपदी जयराम कांबळे बिनविरोध

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०: विहाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार नारायण आबा पाटील गटाचे श्री. जयराम बापू कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांबळे परिवारातील उपसरपंचपद भूषविणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.


तरुण, हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना तसेच गावाच्या प्रगतीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


यावेळी विद्यमान सरपंच सौ. पूजा मोहन मारकड, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रदीप भाऊ हाके, सौ. द्रौपदी कायगुडे, सौ. अश्विनी चोपडे,ग्रा.पं.सदस्या पार्वती भुजबळ,शिवाजी नाळे तसेच माजी सरपंच व ज्येष्ठ नेते श्री. साहेबराव मारकड, श्री. हरिदास गाडे, श्री. प्रभाकर मारकड, माजी सरपंच श्री. बाबुराव देवकते, लक्ष्मण मारकड, अनिल मारकड, हरिदास कायगुडे, पोपट मारकड, श्री. मच्छिंद्र हाके यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
