निवृत्तीनाथांच्या पालखीचा परतीचा प्रवास चिखलातून .. केम-निंभोरे-कोंढेज टप्पा झाला खडतर

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) – पंढरपूर येथून पौर्णिमेचा गोपाळ काला घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला उपळवाटे ते केम तसेच निंभोरे ते कोंढेज या खडतर मार्गाचा सामना करावा लागला 200 वर्षापासून सुरू असलेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मानाच्या पैकी महत्त्वाची पालखी मानली जाते पण तिच्या प्रवासात मात्र या पालखीला उपळवाटे ते केम असे तीन किलोमीटर अंतर तर निंभोरे ते कोंढेज असा पाच किलोमीटरचा टप्पा वारकऱ्यांना चिखलातून पार करावा लागला.

निवृत्तीनाथ महाराज पालखीने परतीचा प्रवास पिंपळनेर…निमगाव…दहिवली… उपळवाटे ते केम… निंभोरे…कोंढेज मार्गे झरे येथे मुक्कामी असतो उपळवाटे ते केम या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना या रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागला तसेच निंभोरे ते कोंढेज अंतर पाच किलोमीटर अंतर पावसामुळे गेली 200 वर्षे या रस्त्यावरून वारकऱ्यांना चिखलातूनच खडतर प्रवास करावा लागत आहे. परंपरेनुसार केम गावात पालखी उपळवाटे ते केम व निंभोरे ते कोंढेज हा रस्ता अतिशय खराब झाला आहे हा रस्ता पार करण्यासाठी वारकऱ्यांसह बैल जोडीला मेहनत करावी लागते वारकऱ्यांशी संवाद साधला असता आम्ही 50 वर्षे झाली वारी करत आहोत परंतु तेव्हापासून हा रस्ता तसाच असल्याचे सांगितले आहे.

निंभोरे ते कोंढेज पाच किलोमीटरचा टप्पा पार करताना जीव कासावीस होतो या रस्त्यावर दोन मोठे ओढे आहेत जास्त पाऊस झाल्यावर या ओढ्यांना पाणी आले तर पालखी ओढ्यातून जाऊ शकत नाही 100 ते 200 वर्षापासून असलेल्या पारंपरिक पालखी रस्त्याची अवस्था खराब असल्याने हा पालखी मार्ग बदलणार असल्याची माहिती पालखी प्रमुख गोसावी महाराज यांनी सांगितले. तसेच यावेळी शासनाने आळंदी ते पंढरपूर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी मार्ग चांगला केला आहे त्यामुळे त्या सोहळ्यातील वारकऱ्यांना त्रास होत नाही आमची दिंडी ही मानाची असताना आमच्या पालखी मार्गाकडे दुर्लक्ष का याबाबत प्रशासन कधी विचार करणार आहे की नाही असे मत गोसावी महाराज त्रंबकेश्वर नाशिक यांनी व्यक्त केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!