करमाळा शहरातील नगरपालिका शाळा व खाजगी क्लासेसना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत : मुस्लिम समाजाची मागणी…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा – बदलापुरात शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले ह्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले महिलावरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात ही विनयभंग बलात्कार अपहरण अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे करमाळा शहरातील सर्व नगरपालिका शाळा व खाजगी क्लासेसना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.
करमाळा तालुक्यामध्ये निर्भया पथक आणि पोलीस प्रशासनाने पोलीस टोल फ्री क्रमांकाचे फलक प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये लावण्यात यावे असे आव्हान केले असताना बहुतांश शाळा व कॉलेजने असे फलक लावलेले नाहीत. मुलींना तात्काळ मदत मिळावी यासाठी शाळा कॉलेजच्या आवारात दर्शनी भागात मोबाईल क्रमांकाचे फलक लावले जावेत असे आवाहन केले तरीही अशा प्रकारची तसदी अनेक संस्थांनी घेतलेली नाही. तालुक्यातील बहुसंख्य शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु त्यातील अनेक बंद अवस्थेत आहेत त्याची दुरुस्ती केलेली जात नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत त्यामुळे सुरक्षितताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे शो बाजी न करता त्याची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. असेही मुस्लिम समाजाचे मत आहे. यावेळी यावेळी जमीर भाई सय्यद आझाद भाई शेख रमजान भाई बेग सुरज भाई शेख,दिशान भाई कबीर, अलीम भाई पठाण, शाहीद भाई बेग, कलंदर भाई शेख, इकबाल भाई शेख, कलीम भाई शेख उपस्थित होते.
खाजगी क्लासेस परिसरात कॅमेरे बसवणे गरजेचे….खाजगी क्लासेस वाल्यांनी देखील मुलींच्या सुरक्षेचे विषय काळजी घ्यावी. खाजगी क्लासेसला देखील बहुसंख्येने मुली शिकण्यासाठी जात आहेत परंतु क्लासेस वाल्याने देखील या मुलींची काळजी घेणे ही खूप महत्वाची बाब आहे. खाजगी क्लासेस मध्ये तसेच परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रोज काय प्रकार घडतो ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे काही घटना घडत असतील तर त्या समोर आणणे देखील तितक्याच महत्त्वाचे आहे. तसेच करमाळा शहरातील नगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.
करमाळा शहरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये या ठिकाणी पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम राबविले पाहिजे. तसेच करमाळा शहरातील विद्यालये व काॅलेज परिसरात महिला दामिनी मार्शल पेट्रोलिंग करिता नेमण्यात यावी अशी मागणी नागरिकांनीची आहे
समीर शेख ( मार्गदर्शक, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा )