निंभोरे येथील शिवराज टांगडे शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ११० कि. वजन गटामध्ये निंभोरे (ता.करमाळा) येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा विद्यार्थी शिवराज नितीन टांगडे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन कुर्डूवाडी के.एन.भिसे कॉलेज मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयाने त्याची विभागीयस्तरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराजने ११० किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.
शिवराजला क्रिडा शिक्षक श्रीकृष्ण बेरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण वाळेकर मुख्याध्यापक श्री व्यवहारे एस.जे. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. निंभोरे येथील प्रथमच विद्यार्थ्याची विभागीयस्तरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यामुळे निंभोरे परिसरात नितिनचे व त्याच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले जात आहे.

