सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग दीक्षित यांचे निधन - Saptahik Sandesh

सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग दीक्षित यांचे निधन

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८: केम (ता. करमाळा) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग कृष्णाजी दीक्षित (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने दीक्षित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून केम परिसरासह करमाळा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. पांडुरंग दीक्षित यांनी करमाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे कार्य केले. सेवाकाळात त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि शिक्षण क्षेत्राशी प्रामाणिकपणे जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शेतीची आवड जपत शेतीमध्ये प्रत्यक्ष काम केले. वयाच्या ८९व्या वर्षापर्यंत त्यांनी साधेपणाने जीवन जगले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, माजी विद्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  रत्नकांत दीक्षित, शशिकांत दीक्षित व प्रा. स्वाती दीक्षित यांचे ते वडील होते.

error: Content is protected !!