उजनीचे पाणी की विषाचा प्रवाह ??- लाखो जीवांचा प्रश्न -

उजनीचे पाणी की विषाचा प्रवाह ??- लाखो जीवांचा प्रश्न

0

सोलापूर जिल्ह्याच्या जीवनवाहिनीचे नाव घेतले तर सर्वप्रथम आठवते ते उजनी धरण. दुष्काळी भागाला पाणी देणारे,…

सोलापूर जिल्ह्याच्या जीवनवाहिनीचे नाव घेतले तर सर्वप्रथम आठवते ते उजनी धरण. दुष्काळी भागाला पाणी देणारे, शेतीला आधार देणारे, उद्योगांना चालना देणारे आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेली उजनी आज स्वतःच प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. एकेकाळी ‘उजनीचे पाणी म्हणजे जीवन’ असे म्हणणारा समाज आज भीतीने आहे.. ‘हेच पाणी आता आजारांचे कारण तर ठरत नाही ना..?’



गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यात कर्करोग, किडनीचे आजार, त्वचारोग, पोटाचे आणि इतर गंभीर व्याधी वाढत आहे. नुकतीच एक बातमी वाचली की, सोलापूर एक अहवाल सादर केला असून, त्यानूसार उजनीच्या पाण्याने जिल्ह्यात २० लाख रुग्ण आहेत. बातमीत शंभर टक्के तथ्य नसेल, पण एकदम भंकस बातमी असेही म्हणता येणार नाही. पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यामधून सोडली जाणारी , औद्योगिक रासायनिक सांडपाणी, शहरातील अशुध्द मैलामिश्रीत पाणी आणि प्रक्रिया न औद्योगिक अवशेष यामुळे उजनीचे पाणी प्रदुषित होत आहे. हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही, तो लाखो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नसते. त्यातून पर्यावरण, शेती आणि आरोग्य असते. जेव्हा नदीत रसायनांचा मारा सुरू होतो, तेव्हा तिचे पाणी शेतात जाते, उतरते, जनावरांच्या शरीरात जाते आणि शेवटी माणसांच्या रक्तात पोहोचते. हे चक्र धोकादायक असते की त्याचे परिणाम हळूहळू दिसतात. त्यामुळेच पर्यावरण तज्ञ वारंवार .. “पाण्याचे प्रदुषण हा संथ गतीने होणारा जीवघेणा हल्ला आहे.

आज प्रश्न असा आहे की, जर नागरीकांच्या मनात एवढी भीती आहे, तर शासनाने व्यापक आणि पारदर्शक वैज्ञानिक अभ्यास का केला नाही ? जर सर्व काही सुरक्षित लोकांसमोर अहवाल खुलेपणाने का ठेवले जात नाही ? आणि जर धोका असेलतर युध्दपातळीवर उपाययोजना का होत नाहीत ?


दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेचे एक कटू वास्तव आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे. आधी इशारे दुर्लक्षित केले जातात, नंतर समित्या नेमल्या जातात, अहवाल येतात, फिरतात आणि लोक मात्र आजारांशी झुंजत राहतात. नदी प्रदुषणाच्या बाबतीतही शोकांतिका आहे. यात नेमकी जबाबदारी कोणाची ?

साखर उद्योग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे नाकारता येत नाही. हजारो शेतकरी, लाखो कामगार यावर अवलंबून आहेत. पण उद्योगाचा विकास जर जनतेच्या किंमतीवर होत असेलतर तो विकास नसून विनाश आहे. साखर कारखान्यातून स्पेंट वॉश (मळी) अत्यंत प्रदुषणकारक मानली जाते. तिची योग्य प्रक्रिया न झाल्यास जमिनीची सुपिकता कमी होणे, भुजल दूषित होणे आणि जलस्त्रोतांवर गंभीर परिणाम होऊ कतात. औद्योगिक केमिकलयुक्त पाणी नदीत मिसळल्यास त्याचा परिणाम पिढ्या न पिढ्या दिसू शकतो. त्यामुळे कोणताही उद्योग कितीही मोठा असो, पर्यावरणातील नियम मोडण्याचा त्याला देता येणार नाही.

जर एखादा कारखाना नियमांचे उल्लंघन करत असेलतर फक्त दंड आकारून मोकळे हा उपाय नाही. असे उद्योग तात्काळ पर्याय निघेपर्यंत बंद ठेवले पाहिजे. एवढेच नव्हेतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. नागरीकांनीही आता ‘सरकार बघेल’ या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे.

प्रथम प्रत्येक गावात पाण्याच्या गुणवत्तेची मागणी झाली पाहिजे. ग्रामसभा, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवर प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. गावातील पाणी शुध्द आहे का ?’ हा प्रश्न प्रत्येक नागरीकाने विचारायला हवा. दुसरे गावोगावी आरोग्य तपासणी मोहिम उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण पाहिजे. विशेषतः कर्करोग, किडनी, लिव्हर आणि त्वचारोग यांची स्क्रीनिंग शिबीरे आवश्यक आहेत. तिसरे म्हणजे सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमी आणि सामान्य नागरीकांनी येऊन ‘उजनी बचाव जनआंदोलन’ उभारण्याची वेळ आली आहे. कारण पाणी हा पक्षाचा विषय नाही; तो जीवनाचा विषय आहे. यावर शासनाने तातडीने उजनीच्या स्वतंत्र वैज्ञानिक ऑडिट करावे. पुणे ते उजनी नदीप्रवाहातील सर्व औद्योगिक पाण्याचे स्त्रोत तपावेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाची स्वायत्त चौकशी करावी. संभाव्य प्रभावित भागात विशेष आरोग्य सर्वेक्षण राबवावे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा गुणवत्ता अहवाल करावा. दोषी उद्योगांवर कठोर पर्यावरणीय कारवाई करावी.

हा प्रश्न केवळ पाण्याचा नव्हे, भविष्याचा प्रश्न आहे. आज उजनीचे पाणी दूषित झाले , उद्या कदाचित पिण्यासाठी सुरक्षित पाणी मिळविणे हीच सर्वात मोठी लढाई होणार आहे. हा विषय राजकारणाच्या व्यासपीठावरचा वाद न बनता समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न ला पाहिजे. कारण शेवट प्रश्न एकच आहे.. ‘जर पाणीच विषारी झाले तर जीवन कसे राहणार ?’ उजनी वाचली पाहिजे, नद्या वाचल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रशासन, ग व जनता तिघांनीही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अन्यथा इतिहास कधीतरी शब्दात लिहिल.. “लोकांना धोका दिसत होता, पण व्यवस्था झोपली होती!”

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!