खातगाव येथील वासुदेव रणसिंग यांचे निधन

करमाळा(दि.२८): खातगाव येथील वासुदेव बाबुराव रणसिंग यांचे काल दिनांक 26 जानेवारी सकाळी साडे आठ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ९४ वर्षांचे होते.
वासुदेव रणसिंग हे एक परमार्थिक व्यक्ती असून वयाच्या पंधरा वर्षापासून ते अतिशय उत्कृष्टपणे हार्मोनियम वादक होते तसेच ते गायनातही तल्लीन होते. त्यांचा ताल सूर अतिशय लयबद्ध होता. खातगाव येथील रणसिंग परिवारातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्यामुळे रणसिंग परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी शेतात झाला. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते






