केमच्या केसीसी संघाने मिळविले कर्मयोगी चषक स्पर्धेचे विजेतेपद

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या कर्मयोगी चषक या क्रिकेट स्पर्धेत केमच्या के.सी.सी संघाने बाजी मारत एक लाख रूपयाचे बक्षीस जिंकले आहे.
जेऊर येथे कर्मयोगी चषकाचे चौथ्या वर्षी आयोजन केले होते. यामध्ये महाराष्टातील नामवंत संघ सहभाग झाले होते
केमच्या के.सी.सी. संघाने फायनल मध्ये वीर मराठा सोलापूर या संघाला हरवत फायनल सामना जिंकला. केसीसी केम या संघाने प्रथम फलंदाजी करत ६ षटकात ३ बाद ७१ धावा केल्या होत्या. जिंकण्यास ७२ धावाचे लक्ष घेऊन वीर मराठा सोलापूर संघ मैदानात उतरला हा संघ ६ षटकात ८ बाद ५३ धावांपर्यंत पोहोचू शकला. टीमच्या संघाने १८ धावांनी अंतिम सामना जिंकून कर्मयोगी चषकावर नाव कोरले.
या वेळी बक्षीस समारंभ पार पडला. विजेत्या केम येथील के.सी.सी संघाचे कप्तान संदिप तळेकर, व संघाचा चषक व एक लाख रूपये बक्षीस पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, जेउरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.







