सालसे येथील अपघातात करमाळ्यातील काळे दांपत्याचा मृत्यू.. - Saptahik Sandesh

सालसे येथील अपघातात करमाळ्यातील काळे दांपत्याचा मृत्यू..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील किल्ला वेस परिसरात राहणारे मनोज काळे (गुरव) (वय ४८) व त्यांची पत्नी पुष्पा मनोज काळे (गुरव) (वय ४२) यांचा आज (ता.२७) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास सालसे येथील चौकात अपघात झाला, या अपघातात पुष्पा काळे या जागीच मयत झाल्या असून, मनोज काळे हे उपचारादरम्यान मयत झाले आहेत.

यात हकीकत अशी कि, मनोज काळे (गुरव) व त्यांची पत्नी पुष्पा मनोज काळे (गुरव) हे आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी माढा तालुक्यात त्यांच्या मोटारसायकलवर गेले होते, तेथून परत येताना सालसे येथील चौकात आले असता एका बोलेरो गाडीने मनोज काळे यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली यात मनोज काळे हे गंभीर जखमी झाले व त्यांची पत्नी पुष्पा या जागीच मयत झाल्या आहेत.

त्यानंतर मनोज काळे यांना उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतु तेथून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले, परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात आज (ता.२७) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास सालसे येथील चौकात झाला आहे. मनोज काळे व पुष्पा काळे यांना एक मुलगा, एक मुलगी, सुन असा परिवार आहे. ही घटना समजताच करमाळा शहरातील विशेषत: किल्ला परिसरातील नागरिकांनी दु:ख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!