क्षितिज ग्रुपकडून पांजरपोळ गोरक्षण संस्थेला मदतीचा हात

करमाळा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत स्वनिधीतून विविध उपक्रम राबविणाऱ्या क्षितिज ग्रुप यांच्याकडून करमाळ्यातील पांजरपोळ गोरक्षण संस्था यांना गायींच्या चारापाण्यासाठी रोख आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी क्षितिज ग्रुपच्या सदस्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड,डॉ. सुनीता दोशी,डॉ. सुजाता मेहता,माधुरी साखरे,माजी मुख्याध्यापिका निलिमा पुंडे, कोर्टीच्या माजी सरपंच नलिनी जाधव, मंजू देवी,सुप्रिया येवले, स्वाती माने,कावेरी देशमुख आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी संस्थेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली तसेच गोरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष भरत गांधी, संगीता गांधी आणि जाकीर पठाण यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती देत गोरक्षण व गोपालन कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि मान्यवरांच्या सक्रिय सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन मंगेश गांधी यांनी केले.

