भोसले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर - 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान.. - Saptahik Sandesh

भोसले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर – 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे

कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील ह. भ. प. कै.त्रिंबक अण्णा भोसले महाराज यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदात्यांना ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले .तसेच पुण्यस्मरण दिनानिमित्त ह .भ .प .बाळासाहेब भोसले महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी कंदर चे सरपंच प्रतिनिधी भास्करराव भांगे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे भाजपाचे बंडू माने युवा नेते विजयसिंह नवले ह भ प काका भोसले महाराज आदी मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कुर्डूवाडी ब्लड बँकेचे सोमनाथ चव्हाण कल्याण गवळी किरण कोथमीरे ऋषिकेश धस अर्पिता सातारकर संजना माने यांनी विशेष परिश्रम घेतले… कार्यक्रमास गावातील समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!