केळी संशोधन प्रकल्प निर्मितीची गरज - प्रा.शिवाजीराव बंडगर - Saptahik Sandesh

केळी संशोधन प्रकल्प निर्मितीची गरज – प्रा.शिवाजीराव बंडगर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील केळीचे भरघोष व दर्जेदार उत्पादन पाहता तालुक्यात केळीच्या साठवणूकीच्या बरोबरच केळी संशोधन प्रकल्प निर्मितीची गरज असल्याचे प्रतिपादन करमाळा क्रषि उत्पन्न बाजार समिति चे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांनी कंदर येथे बोलताना केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रषि पणन मंडळ सरव्यवस्थापक राजेंद्र महाजन हे होते. कंदर (ता.करमाळा) येथे साईक्रपा मंगल कार्यालयात राज्य पणन मंडळ,पुणे,कृषि विभाग महाराष्ट्र राज्य, व क्रषी उत्पन्न बाजार समिती करमाळाच्या संयुक्त विद्यमाने केळी निर्यात विषयक क्षमता व्रद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री.बंडगर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तालुका क्रषी अधिकारी संजय वाकडे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख, उपविभागीय क्रषि अधिकारी रविंद्र कांबळे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे,दिपकआबा देशमुख, बाजार समिती चे संचालक दादा मोरे,आदिनाथचे संचालक भागवत पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, करमाळा तालुक्यात केळी साठी आवश्यक असलेले हवामान असून जळगाव पेक्षा ही अधिक व दर्जेदार उत्पन्न इथे होत आहे . त्यामुळे आपली स्पर्धा आता जळगाव शी नसून अमेरिके सारख्या देशात केळी निर्यात करण्यार्या देशाशी आहे .त्यामुळे तालुक्यात केळी ची साठवणूक करण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर व्हायला हवी . तसेच निर्यात क्षम केळी उत्पादीत होण्यासाठी केळी संशोधन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.

तालुका क्रषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले ,उजनी जलाशय काठावरील गावाबरोबरच दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे पाणी पोहोचलेल्या वरकटणे, सोंदे,गुळसडी आदी गावातही केळी उत्पादक शेतकरी वाढत असून शेतकर्यांची फसवणूक होवू नये म्हणून अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. तालुका क्रषी विभाग शेतकर्याला वेळोवेळी मदत करायला तयार आहे . शेतकर्यानी या प्रशिक्षणातून अधिक लाभ घ्यावा.

प्रस्ताविक पणन मंडळाचे अनंत सावरकर यानी केले . स्वागत करमाळा बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर , पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक दयानंद देशमुख यांनी केले. यावेळी दिसभरात सौ काजल म्हात्रे यांचं मातीचे आरोग्य व व्यवस्थापन, प्रा एन बी शेख यांचं आधुनिक केळी उत्पादन व सुगीपश्चात हाताळणी ,अभिजित पाटील यांचं लाल केळी उत्पादन ,किरण डोके यांचं निर्यातदाराचे मनोगत, सचिन वाळुंज यांचं केळी विपणन या विषयावर तर उत्पादन समस्या निराकरण या विषयावर यांचं मार्गदर्शन झाले.

या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणारे वांगी नं 1येथील शेतकरी हनुमंत यादव ,वांगी चे माजी सरपंच विठ्ठल शेळके, नगरपालिका माजी मुख्याधिकारी जगताप, सोमनाथ हुलगे, अनिल काळे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ भांगे,प्रगतीशील बागायतदार ॲड जालिंदर बसळे, वाय जी भोसले ,अरुण पवार यानी सहभाग घेत प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. यावेळी तीनशे शेतकर्यानी प्रशिक्षणाबरोबरच सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी आभार पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक दयानंद देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!