डिकसळ पुलावरील लोखंडी अँगल काढा- शिवसेना समन्वयक चांदगुडे.. - Saptahik Sandesh

डिकसळ पुलावरील लोखंडी अँगल काढा- शिवसेना समन्वयक चांदगुडे..

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.29 : उजनी धरणावरील डिकसळ पुलावरील लोखंडी अँगल रस्त्यालगतच वर आलेला आहे. या अँगलवर चारचाकी गाडी गेली तर टायर फुटून अपघात होऊन वहान पाण्यात पडून मोठा अपघात होऊन शकतो, त्यामुळे सदरचा अँगल तात्काळ काढून रस्ता व्यवस्थीत करावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा समन्वयक अध्यक्ष निखील चांदगुडे यांनी केली आहे.

डिकसळ पुलावरील जवळील रस्त्यावर हा गर्डेल वजा अँगल त्यांना प्रवासादरम्यान दिसला. अपघात होऊ शकतो हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी गाडीतून खाली उतरून त्याभोवती दगडे टाकलेली आहेत, पण ते सर्वच धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन तात्काळ दुरूस्ती करावी अशीही मागणी श्री. चांदगुडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!