कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उत्पादनाचा लाभ देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.. - Saptahik Sandesh

कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उत्पादनाचा लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूर अधिवेशनावर काढण्यात आलेल्या पेन्शन संकल्प यात्रेची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उपदानाचा लाभ देण्याचे मान्य केले.

पेन्शन संकल्प यात्रेच्या तिसऱ्या दिवशी खापरी येथून सुरू झालेली यात्रा नागपूर विधानभवनाव नेण्यात आली. विधानपरिषदेत स्वतः आमदार कपिल पाटील साहेब यांनी लाखाच्या वर गर्दी पेन्शन संकल्प यात्रेत आहे असे सांगितले. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमचा पक्ष जुनी पेन्शनसाठी पूर्ण सकारात्मक असून आमच्या जाहीरनाम्यात हा विषय प्राधान्याने असेल.

विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील, सुधीर तांबे, विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी मोर्चत सहभागी होत कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. रस्त्यावर उतरलेल्या बांधवांची बाजू आज त्यांनी विधिमंडळात लावून धरली. विधानसभेचे तरुण नेतृत्व माजी मंत्री सन्माननीय विश्वजीत कदम साहेब, आमदार रोहित पवार यांनी आजच्या मोर्चाला संबोधित करताना आम्ही सोबत आहोत अशी ग्वाही दिली.

नागपूर पेन्शन संकल्प यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी केले. विजयकुमार बंधू यांनी राज्य सरकारला इशारा दिला, जर तुम्ही पेन्शन देणार नसाल तर तुम्ही सत्तेवर येऊ शकणार नाही. फक्त आणि फक्त पेन्शन संघटनाच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देऊ शकते. लाखोंचे मोर्चे काढून पेन्शन मिळवण्याचे सामर्थ्य फक्त पेन्शन संघटनेकडेच आहे.

यावेळी सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने प्रशांत लंबे,जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, किरण काळे, साईनाथ देवकर, आशिष चव्हाण, अर्जुन पिसे, सचिन क्षिरसागर ,शिवानंद बारबोले,सैदाप्पा कोळी, संदीप गायकवाड,सतीश चिंदे, सतीश लेंडवे, बाबासाहेब घोडके, विजय राऊत, कृष्णदेव पवार, धनंजय धबधबे,उमेश सरवळे , ज्योती कलुबर्मे , अरुण चौगुले, अरुण राठोड, कमलाकर दावणे, प्रविण देशमुख, राजेंद्र सुर्यवंशी, स्वाती चोपडे, दिपक वडवेराव, रियाज मुलाणी, राजेंद्र कांबळे,राजू कैय्यावाले, दिपक पुजारी, रविराज नष्टे, विजय भांगे, प्रकाश चव्हाण, सुहास राऊळ, अनिल मदने, प्रमोद चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीवर ठाम असून कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उपदानाचा लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे. लाखापेक्षा जास्त गर्दीचा मोर्चाची दखल घेत जुनी पेन्शनला पूर्ण नकार देणाऱ्या सरकारने जुनी पेन्शनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे त्याबद्दल धन्यवाद..! पण जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. – अरूण चौगुले (सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना,करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!