उत्तरेश्वर कॉलेज मध्ये साने गुरुजी कथामाला अभ्यास केंद्राचे उद्घाटन संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अभ्यास केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मराठवाडा विभाग प्रमुख व आजीव सेवक प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे उपस्थित होते. साने गुरुजी कथामाला अभ्यास केंद्र हे निश्चितच येथील कॉलेजच्या मुलांसाठी एक संस्कार केंद्र म्हणून असणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर, श्री सचिन रणशुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री एस. बी. कदम हे होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना साने गुरुजी कथामाला सोलापूर यांच्या वतीने साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या अभ्यास केंद्रावर एकूण शंभर विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या 151 वृक्षांचे संवर्धन करण्याकरिता केम गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ताभाऊ तळेकर यांनी पाण्याची सुलभ सोय होण्याकरिता दोन ड्रीप संच मोफत भेट दिले. या ड्रीप योजनेचे उद्घाटन श्री दत्ताभाऊ तळेकर यांच्या हस्ते झाले.
तसेच यावेळी डॉ. बापूजी साळुंखे क्रीडा संकुलाचे उद्घाटन श्री सचिन रणशिंगारे यांच्या हस्ते झाले. यावेळी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतुरचे प्राचार्य श्री दिलावर मुलांनी, मा.प्राचार्य श्री विष्णू कदम, प्रा.मालोजी पवार, प्रा.अमोल तळेकर, श्री डी.एन. तळेकर, वसतीगृह अधीक्षक श्री सागर महानवर, श्री सरफराज मोमीन इत्यादी गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. या यावेळी उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचे प्रा. डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे प्रा. सतीश बनसोडे , प्रा.पराग कुलकर्णी यांनी सहकार्य केले.