दिलासा योजनेंतर्गत एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी.पुर्व परीक्षा पास विद्यार्थ्यांना देणार अनुदान – मनोज राऊत..

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.28: पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगातून दिलासा योजनेंतर्गत एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. पुर्व परीक्षा पास झालेल्या स्पर्धा परिक्षार्थींना 5000 रूपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र स्पर्धकांनी अर्ज करावेत असे अवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री. राऊत यांनी म्हटले की..सन 2022 मध्ये जे पुर्व परीक्षा पास झाले व ज्यांनी बार्टी वा तत्सम संस्थेकडून अनुदान घेतले नाही. अशांना पंचायत समिती मासिक सभेने हा पुढाकार घेतलेला असून ही योजना ठरवली आहे. त्यानुसार परीक्षार्थिंनी पंचायतसमिती कडे अर्ज करावेत .सोबत पुर्व परीक्षा पास झाल्याबाबतचा पुरावा जोडावा असेही अवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

