मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीरात 81 जणांची तपासणी - आतापर्यंत 4020 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन.. - Saptahik Sandesh

मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीरात 81 जणांची तपासणी – आतापर्यंत 4020 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (ता.२७) मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली असून, 81 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे व 24 रुग्ण ऑपेरेशनसाठी पुण्याकडे रवाना झाले आहेत.

यावेळी या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डॉ. बिपीनजी परदेशीं यांचेसह संतोषजी गानबोटे,भैया राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्रेणिक खाटेर यांनी म्हटले की, आपण आतापर्यंत तपासणी कार्यक्रमानंतर जवळपास 4020 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे, तसेच आज 81 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 24 रुग्ण ऑपेरेशन साठी पुण्याकडे रवाना झाले आहेत, भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.खाटेर यांनी केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. बिपीन परदेशीं यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. संतोष गानबोटे यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले. या शिबिरासाठी पोपट बरीदे, दिनेश मुथा, गणेश बोरा, विलास डिसले ,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, अभय शिंगावी, प्रीतम राठोड,यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या शेवटी संकेत खाटेर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला करमाळ्यातील श्री कमलाभवानी देवीचा रोड, बायपास चौक येथे हे शिबीर होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!