‘करमाळा तहसील’ व ‘ग्राहक पंचायत’ च्यावतीने ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तहसिल कार्यालयात महसूल प्रशासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळायुनिटच्या वतीने 24 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘ग्राहक गीताने’ करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार समीर माने यांनी भूषविले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी केले. यावेळी सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सचिन साखरे माधुरीताई परदेशी रेखा परदेशी करमाळा तालुका अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विचार व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ग्राहक कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी महसूल नायब तहसीलदार श्री.बदे, पुरवठा अधिकारी हनुमंत जाधव पुरवठा निरीक्षक श्री.बडकुंभे पुरवठा विभागातील अरगनुरकर मंडळाधिकारी दादासाहेब गायकवाड, मंडळाधिकारी संतोष गोसावी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सचिन साखरे, सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरीताई परदेशी, करमाळा तालुका अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे, तालुका सचिव संजय हंडे, तालुका सदस्य, अजिम खान, अनिल शिंदे, संभाजी कोळेकर, महिला आघाडी सदस्या मंजिरीताई जोशी, ललिता ताई वांगडे, सारीकाताई पुराणिक, निशीगंधा शेंडे इ. उपस्थित होते.
याप्रसंगी करमाळा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख तथा प्रतिनिधी तसेच स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाधिकारी श्री.गायकवाड यांनी केले. आभार महसूल नायब तहसीलदार श्री.बदे यांनी मानले.

