मुंबई लोहमार्ग पोलीस पदी महेक पटेलची निवड - उत्तरेश्वर कॉलेजकडून सत्कार -

मुंबई लोहमार्ग पोलीस पदी महेक पटेलची निवड – उत्तरेश्वर कॉलेजकडून सत्कार

0

केम(संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम येथील कु. महेक पटेल हिची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात महेक पटेल हिची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बापूराव पवार, प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर, प्रा. मालोजी पवार, प्रा. मोहन राठोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य माधव बेले होते.


प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बापूराव पवार यांनी कॉलेजमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नवोपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी, साप्ताहिक उपक्रम तसेच लेखन, वाचन आणि भाषण या कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले.



यावेळी महेक पटेल हिने आपल्या यशामागे कॉलेजमध्ये दररोज राबविण्यात येणाऱ्या ‘आजची महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान माहिती’ या उपक्रमाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. प्राध्यापकांचे मार्गदर्शन व कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे हे यश मिळाल्याचे तिने नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य माधव बेले यांनी कॉलेजमधील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असून त्यामुळेच स्पर्धा परीक्षेत यश मिळत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. एस. के. पाटील व प्रा. सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!