“नाचून नाही, तर वाचून” संदेशातून मांगीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदर्श पद्धतीने साजरी -

“नाचून नाही, तर वाचून” संदेशातून मांगीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदर्श पद्धतीने साजरी

0

करमाळा(दि.१५) : करमाळा तालुक्यातील मांगी हे गाव नेहमीच आदर्श उपक्रमांसाठी ओळखले जाते. १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती “नाचून नाही, तर वाचून” या संदेशाला साजेशी पद्धतीने साजरी करण्यात आली. १३ एप्रिलच्या मध्यरात्री महामानवाला अभिवादन करून समाजबांधवांनी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करत भीमगीतांच्या गजरात जन्मोत्सव साजरा केला.



१४ एप्रिल रोजी सकाळी मांगी येथील पंचशील बुद्ध विहारासमोर सडा-रांगोळी काढण्यात आली. गावातील जेष्ठ व युवा मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्धपूजन व बुद्धवंदना घेण्यात आली. मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देत बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी निधी खर्च करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल-कोलते यांनी स्वखर्चातून बुद्ध विहाराच्या रंगरंगोटीकरिता धम्मदान दिले.

पंचशील बुद्ध विहार, मांगी

या कार्यक्रमावेळी मांगी गावातील नागरिक तसेच घूमट वस्ती व राजवाडा परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आदर्श जयंती उत्सवाबद्दल पंचशील बुद्ध विहार समितीच्या स्तुत्य कार्याचे कौतुक करत सुजित बागल यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले. या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक केले जात आहे.



या जयंती उत्सवाला सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सुजित तात्या बागल, सरपंच सौ. सोनाली गायकवाड, उपसरपंच नवनाथ बागल, ग्रामसेवक इंगळे, पोलीस पाटील आकाश शिंदे, अमित बागल, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, पप्पू शिंदे, बन्सी गायकवाड, संदीपान बागल, नितीन शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता अवचर, गोटू बागल, निलेश बागल, अॅड. विक्रम चौरे, आदेश बागल, रोहित शिंदे, ग्रामशिपाई संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा आदर्श जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी पंचशील बुद्ध विहार समितीचे सदस्य प्रेम चव्हाण, शुभम अवचर, अजिनाथ अवचर, संतोष चव्हाण, शहाजी अवचर, अजय अवचर, राजकुमार अवचर, सुशांत चव्हाण, रोहित शिंदे, गुरपत पवार, शाम पवार, प्रकाश अवचर, नवनाथ अवचर, राहुल अवचर, हर्षवर्धन अवचर, अंकुश अवचर, सागर अवचर, अभिमान अवचर, महादेव अवचर, अर्जुन अवचर तसेच मार्गदर्शक पत्रकार प्रवीण अवचर यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!