केम येथील सूरज शिंदे यांची मुंबई पोलिस दलात निवड; वडिलांचे स्वप्न मुलाने केले पूर्ण

केम(संजय जाधव): केम येथील सूरज गोरख शिंदे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या निवडीनंतर केम परिसरातून सूरज शिंदे व त्यांच्या परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सूरज शिंदे यांचे माध्यमिक शिक्षण केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुणे येथे घेतले. पुण्यात राहून त्यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत मेहनतीने तयारी केली.
सूरज यांचे वडील गोरख शिंदे यांनी पोलीस भरतीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. आपल्या वडिलांची पोलीस होण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार सूरज यांनी केला आणि अखेर मुंबई पोलीस दलात निवड होऊन त्यांनी कुटुंबाचे स्वप्न साकार केले.
सूरज शिंदे यांच्या निवडीबद्दल ह.भ.प. संजय नवले, माजी सभापती शेखर गाडे, माजी सरपंच अजितदादा तळेकर, उपसरपंच शरद वायभासे, दत्तात्रय कुलकर्णी, बंडू दौड, चेअरमन बाळासाहेब तळेकर, महंत जयंतगिरी महाराज, दादासाहेब नवले तसेच दादा शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. केम परिसरात त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

