त्र्यंबकेश्वर-पंढरपूर निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या केम मुक्कामाबाबत बैठक संपन्न

0

केम (संजय जाधव): त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या केम मुक्कामासंदर्भात नियोजन बैठक संपन्न झाली. पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील केम मुक्कामाच्या तयारीसाठी पालखी सोहळा पदाधिकाऱ्यांनी केम येथे भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असल्याने पालखी ज्या गावात मुक्कामाला असते, त्या ठिकाणी ग्रामस्थांसोबत समन्वय साधून नियोजन केले जाते. त्यानुसार केम येथे ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी व पालखी प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.


या वेळी राजुरी ते वेणेगाव या पालखी मार्गाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. ऊपळवाटे, केम, निंभोरे, कोंढेथ व झरे या मार्गावरून पालखी जात असल्याने रस्त्यांची स्थिती, मुक्कामाची व्यवस्था व वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात रात्री उशिरा बैठक घेण्यात आली. बैठकीत पालखी मुक्कामाचे नियोजन, रस्त्यांच्या समस्या तसेच आवश्यक सुविधांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सूचना मांडल्या.

बैठकीस संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे, विश्वस्त ह.भ.प. नवनाथ गांगुर्डे महाराज, चोपदार ह.भ.प. सागर दौड, वारकरी ज्ञानेश्वर माऊली दाते, संदीप महाराज तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज उपस्थित होते. बैठकीनंतर केम ग्रामस्थांच्या वतीने पालखी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!