आळजापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड – ११ जण रंगेहात सापडले..


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा: आळजापूर येथे सुरू असलेल्या खासगी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून अकराजणांना रंगेहात पकडले. पोलिसांची चाहूल लागताच सातजण उसाच्या शेतातून पळून गेल्याची घटना दि. १६ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन निवृत्ती कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांना आळजापूर येथे खासगी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दि. १६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तेथे छापा टाकला त्यावेळी जालिंदर नामदेव शेगर, अंबादास काळे, अंकुश शंकर रोडे (सर्व रा. आळजापूर) तसेच दिलीप उत्तम मुरूमकर (रा. बिटरगाव) हे जुगार खेळताना जागेवर आढळून आले.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच सुनील मधुकर काळे, विष्णू दिलीप आखाडे, पप्पू काळे, दत्तात्रय अडसूळ, नवनाथ वाकळे, सुनील शेवाळे व बालाजी पवार (सर्व रा. आळजापूर) हे उसाच्या शेतातून पळून गेले.
पोलिसांनी जुगाराच्या ठिकाणाहून रोख रक्कम २८१० रुपये व पत्त्यांचा डाव तसेच निळ्या रंगाची बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!