करमाळा शहरासाठी तब्बल ५.२५ कोटींचा निधी; विविध विकासकामांची तरतूद.. -

करमाळा शहरासाठी तब्बल ५.२५ कोटींचा निधी; विविध विकासकामांची तरतूद..

0

करमाळा संदेश /प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने करमाळा शहरासाठी विविध विकासकामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीबद्दल नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांनी नगरपरिषद व शहरवासियांच्यावतीने पालकमंत्री गोरे यांचे आभार मानले, तसेच करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, आगामी काळातही अधिकाधिक निधी आणून विकासकामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हा स्तर) अंतर्गत पुढीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी रु. ४५,६७,८२८ निधी देण्यात आला आहे. तसेच संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरणासाठी रु. १,४९,३१,९८८ इतका मोठा निधी मंजूर झाला आहे.

याचबरोबर चांदगुडे गल्ली परिसरातील विविध कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला असून, अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर रस्ता काँक्रीटीकरण (भाग ब) साठी रु. ८,९०,३११, राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रीटीकरण (भाग अ) साठी रु. ७,३८,९८९, तसेच त्याच रस्त्याच्या भाग ब साठी रु. ५,७५,१०० निधी मंजूर झाला आहे.

तसेच मांगले घर ते पवार घर रस्ता काँक्रीटीकरणासाठी रु. ९,९९,५६२, मांगले घर ते चांदगुडे घर रस्ता काँक्रीटीकरणासाठी रु. ९,९९,५६२, चिंचकर घर ते समाज मंदिर ते माने घर ते निकम घर रस्ता काँक्रीटीकरणासाठी रु. ९,९९,५६२ निधी देण्यात आला आहे. चांदगुडे गल्लीतील विविध भागात गटार बांधकामासाठी रु. ३०,८९,८७० तर प्रभाग क्र. १ मध्ये नगरपालिकेच्या जागेवर १० सीट शौचालय बांधकामासाठी रु. २५,२७,११० निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्र. १० मौलाली माळ भागात विविध विकासकामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये गटार बांधकाम (भाग अ) साठी रु. ४३,८३,०५९, गटार बांधकाम (भाग ब) साठी रु. २४,३५,५५१ निधी देण्यात आला आहे. तसेच स्त्री व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम (भाग अ) साठी रु. २६,८९,१३९ व (भाग ब) साठीही रु. २६,८९,१३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण रु. ४,२५,१६,७७० (चार कोटी पंचवीस लाख सोळा हजार सातशे सत्तर) इतका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केला आहे.

याशिवाय ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी रु. १ कोटी निधी मंजूर झाला असून कृष्णाजी नगर येथे हे उद्यान उभारण्यात येणार आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान अंतर्गत शिक्षणासाठी रु. ५० लाख व आरोग्यासाठी रु. ५० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी मिळवण्यासाठी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, सर्व नगरसेवक, करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक संजय सावंत, दिपक चव्हाण, सचिन घोलप, सुनील सावंत तसेच सर्व नगरसेवक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!