सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थानात शमी पानांची आकर्षक आरास -

सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थानात शमी पानांची आकर्षक आरास

0

केम(संजय जाधव)– सोमवार निमित्त येथील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे शमी वृक्षाच्या पानांची सुंदर आरास करण्यात आली. मंदिरातील ही आरास भैय्या मोकाशी, तात्या गुरव आणि कृष्णा गुरव यांनी साकारली.

या आरासेमुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनमोहक रूप पाहायला मिळत असून, अनेकांनी समाधान व्यक्त केले. शमी पानांनी सजविलेल्या शिवलिंगाच्या या देखाव्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्री उत्तरेश्वर देवस्थानात दर सोमवारी तसेच सणानिमित्त शिवलिंगाची विविध रूपांत आकर्षक आरास केली जाते. त्याच परंपरेनुसार यावेळी शमी वृक्षाच्या पानांची आरास करण्यात आली होती. मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर मन प्रसन्न झाल्याची भावना भक्त विजय कुमार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!