सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात योगदान द्या – डॉ. ॲड.हिरडे

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२२: “शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून थांबू नये, तर समाजासाठीही योग्य ते योगदान देणे आवश्यक आहे. समाजकार्यात सहभागी झाल्यास व्यक्तीचे जीवन अधिक आनंदी व समाधानकारक होते.” असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी व्यक्त केले.

श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा) येथील सीआरपीएफमधून 23 वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या सोमनाथ विलास डबडे यांच्या सन्मानार्थ ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ.हिरडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की डबडे कुटुंबाने संघर्षमय प्रवास केला. “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहत देशसेवेत मोलाचे योगदान देणे ही मोठी गोष्ट आहे. डबडे परिवाराने एक मुलगा सीआरपीएफमध्ये आणि दुसरा पोलीस खात्यात पाठवून देशसेवेचा आदर्श घालून दिला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, श्री. सोमनाथ डबडे यांनी पुढील आयुष्यातही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रोहन पाटील तसेच यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. नागेश माने उपस्थित होते, त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्ती सोमनाथ डबडे, महादेव भोसले, अंगद बिडवे, ॲड. बीभीषण सोरटे, लष्कर सर, सागर पुराणिक, श्रीनिवास पुराणिक आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डबडे यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी अधिकारी महादेवराव भोसले यांनी केले.

कार्यक्रमाला श्री. विलास डबडे, श्री. बाबुराव डबडे (गुरुजी), सोरटे गुरुजी, पै. श्री. जयराम सोरटे, श्री. नागनाथ चिवटे, कवी प्रकाश लावंड, नवनाथ सोरटे (दादा)श्री. चव्हाण मेजर, श्री. दादासाहेब सोरटे सर, पै. श्री. अभिमान पवार, श्री. सतीश थोरबोले, श्री. दिलीप चव्हाण, श्री. बाळासाहेब डबडे, श्री. प्रविण डबडे, श्री. अविनाश तवळ, श्री. शिवाजी बारगजे, श्री. रितेश रानभरे, श्री. सदानंद भागवत, श्री. गजानन जंत्रे, श्री. दिगंबर इंगळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाने गावात एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला.
