‘पांगरे’चे माजी सरपंच शिवाजी (आबा) टेकाळे यांचे निधन

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : पांगरे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे सलग 10 वर्षे सरपंच म्हणून उत्कृष्ट कारकिर्द असणारे शिवाजीराव (आबा) टेकाळे (वय – 67) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पांगरे गावात सामाजिक कार्यात ते आघाडीवरती होते. सलग 10 वर्षे सरपंच म्हणून ते कार्यरत होते. सध्या त्यांचे चिरंजीव महादेव टेकाळे हे विद्यमान उपसरपंच आहेत. अशोक लेलॅंड कंपनीचे कोल्हापूर विभागाचे विपनन अधिकारी भैरवनाथ टेकाळे व व्यावसायिक गिरीश टेकाळे यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने पांगरे गावावरती शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!