सिद्धार्थ नगरमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

करमाळा : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर येथील त्यागमूर्ती माता रमाई बुद्ध विहार येथे रविवारी (दि. 31 मे) सायंकाळी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, करमाळा व भिमगर्जना लेझिम संघ तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमात भिमगर्जना लेझिम संघाचे संस्थापक अध्यक्ष शिलराज दशरथ कांबळे यांच्यासह अरविंद अरुण समिंदर, अभिजीत अशोक सदाफुले, किरण तुकाराम मोरे, अजय आप्पासाहेब कांबळे, बापूसाहेब कैलास कांबळे, गौरव राजेंद्र चव्हाण, अमित ज्ञानदेव भोसले आदी सदस्य उपस्थित होते.

जयंतीनिमित्त गोडधोड वाटप
कार्यक्रमाचे औचित्य साधून मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व भिमगर्जना लेझिम संघाच्या वतीने अरविंद अरुण समिंदर, अभिजीत अशोक सदाफुले, अमित ज्ञानदेव भोसले यांच्या हस्ते तसेच दिलीप तुकाराम कांबळे यांच्या परिवारातर्फे भीमराव (फकीरा) कांबळे यांच्या हस्ते उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.
सामुदायिक बुद्ध वंदना व मार्गदर्शन
केंद्रीय शिक्षिका शोभाताई कांबळे व केंद्रीय शिक्षिका पुष्पाताई भीमराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच बुद्ध विहारात ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व याविषयी सुजाताताई रमेश धेंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या योगदानाबद्दल शालनबाई कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शांताबाई महादेव कांबळे यांच्या परिवाराच्या वतीने दिवंगत महादेव विश्वनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ उपस्थितांना हापूस आंब्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप शरणत्व गाथा घेऊन करण्यात आला.

