पाकिस्तानचा ध्वज जाळत शिवसेनकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

0

केम(संजय जाधव): काश्मीर मधील पहलमा येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याया निषेधार्थ शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत जाळून निषेध करण्यात आला.

संतप्त झालेल्या शिवसैनीकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तर भारत माता की जय हिंदुस्थान जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. या सरकार विरोधात व हल्ल्या बाबत सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न आहेत परंतू राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने आम्ही सरकार सोबत आहोत सरकारने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे नामोनिशान मिटवून टाकावे अशी मागणी केली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव तालुका प्रमुख शंभुराजे फरतडे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष भालेराव, युवासेना शहर प्रमुख समिर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर,विभाग प्रमुख अविनाश गाडे ,युवासेना गटप्रमुख मयुर तावरे, कालिदास कदम, शाखाप्रमुख बालाजी वाडेकर शाखाप्रमुख दिगंबर काटुळे, ज्ञानदेव लोंढे, भाऊराव मस्तूद, अनिकेत नवगन, काॅलेज कक्ष तालुकाप्रमुख अमिर कबीर, महेश काळे पाटील, आकाश सरडे,रोहन सरडे आदी उपस्थित होते.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!