पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाने करमाळ्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

करमाळा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व कामगिरी करत बहुमताचा टप्पा पार केला असून राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात भाजपला यश मिळाले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा या निवडणुकीत अक्षरशः धुव्वा उडाला आहे.

या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात “जय श्रीराम”, “वंदे मातरम”, “भारत माता की जय” भारतीय जनता पार्टीचा विजय असो ” अशा घोषणा देण्यात आल्या ,
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी बोलताना सांगितले की, “पश्चिम बंगालच्या जनतेने अन्यायकारक आणि हुकूमशाही कारभाराला ठाम नकार देत विकासाच्या राजकारणाला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास हा देशातील बदलत्या राजकीय प्रवाहाचा स्पष्ट संकेत आहे. हा विजय केवळ बंगालपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशातील परिवर्तनाची नांदी आहे असे सांगीतले,
यावेळी डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपा नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, सरचिटणीस नितीन झिंजाडे, गणेश महाडिक, अमोल पवार, दत्तात्रय बेडकुते, स्वानंद वांगडे, कपिल मंडलिक, राहुल रामदासी, जयंत काळे, भरत गुंड, प्रसाद गेंड, शरद कोकीळ, संजय किरवे, गणेश गोसावी, विनोद इंदलकर, शैलेश राजमाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


