वांगी नं.३ येथे भरदिवसा मोटारसायकलची चोरी.. - Saptahik Sandesh

वांगी नं.३ येथे भरदिवसा मोटारसायकलची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घरासमोर लावलेली मोटारसायकल भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना वांगी नं. ३ (ता. करमाळा) येथे घडली आहे. या प्रकरणी धिरज विलास रोकडे (रा. वांगी नं. ३) यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या चुलत बहिणीचे लग्न कंदर येथे असल्याने मी ८ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घरासमोर गाडी क्र. एमएच ४५ सी १४५६ ही मोटारसायकल लावून लग्नाला गेलो होतो.

त्याचदिवशी दुपारी दोनच्या दरम्यान परत घराकडे आल्यानंतर घरासमोरील गाडी दिसून आली नाही. सर्वत्र शोधूनही त्याचा शोध न लागल्याने अज्ञात चोरट्यांनी गाडी चोरून नेल्याची खात्री झाली. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!