वीट व कोर्टी येथे मटका चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वीट (ता.करमाळा) येथे १ फेब्रुवारीला सायंकाळी पावणेआठ वाजता मटका चालविणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की वीट येथील भाजीमंडई जवळ लहु रामकृष्ण वाघमारे रा.वीट हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून मिलन नाईट नावाचा मटक्याचे आकडे घेताना आढळून आला आहे. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्लीप बुक, निळा शाईचा पेन व १०५० रूपये रोख जप्त केले आहेत. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहुरकर हे करत आहेत.
कोर्टी (ता.करमाळा) येथे १ फेब्रुवारीला मटका चालविणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की कोर्टी येथे बसस्टॅन्ड जवळ आकाश नामदेव माने हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून मिलन नाईट नावाचा मटक्याचे आकडे घेताना आढळून आला आहे. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्लीप बुक, निळा शाईचा पेन व ११७० रूपये रोख जप्त केले आहेत. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहुरकर हे करत आहेत.